श्रीराम भटसध्याच्या संगणकीय युगात कनेक्टिव्हिटीचे महत्त्व वाढलं आहे. कनेक्टिव्हिटी म्हणजे विशिष्ट संधान राखणे किंवा त्या संधानाचा पाठपुरावा करत राहणे असाच होतो. योगशास्त्रात अनुसंधान हा एक कनेक्टिव्हिटीचाच प्रकार आहे. .मन हे मुळाशी घातले, की जे अनुसंधान उरते किंवा जे मन उन्मत होते किंवा मनाचे मौन होतं किंवा त्या मौनाचेही मौन ज्या वेळी अनंत ब्रह्मांडातील अनंत जी.बी.ची कनेक्टिव्हिटी साधते ती कनेक्टिव्हिटी खरोखर अगाध असते.कलियुग म्हणजे गोंधळ, अर्थातच वैज्ञानिक भाषेत अनुसंधानातून भरकटलेले अर्थातच आउट ऑफ रेंज अर्थातच आत्मानुसंधानाची किंवा अनुसंधानाकडे नेणारी वाट चुकलेले मनच होय. सध्या विचित्र विचारांच्या किंवा कामक्रोधाच्या आवेगातून, अर्थातच हाय व्होल्टेजच्या प्रभावाखाली माणूस एका वेगळ्याच अवकाशात भटकत जणू काही सध्याच्या संगणकीय भाषेत एरोप्लेन मोडमध्ये येतो. आहे की नाही गंमत! मानवी मनाचे मानसशास्त्र हे एका अद्भुत कनेक्टिव्हिटीशी संबंधित आहे. या अद्भुत कनेक्टिव्हिटीशी देवदीपावलीचा संबंध येतो..मित्र हो, आपली ग्रहमाला ही एक कनेक्टिव्हिटी साधून असतेच असते. त्यामुळेच ती विशिष्ट कक्षेतच फिरत असते. भगवंतांनी मार्गशीर्ष महिना ही आपली एक विभूती सांगितली आहे. अर्थातच या मार्गशीर्ष महिन्यातच देवदीपावली आणि गीताजयंती येत असते. उद्याच्या सोमवारी देवदीपावली सुरू होत आहे. या दिवशीच चंद्रबुध युतियोग होत आहे. सप्ताहात रविबुध युतियोग बरोबर, रविगुरु प्रतियुतीही होत आहे. आपली ग्रहमाला ही स्वर्गलोकाशी कनेक्टिव्हिटी साधणारी निश्चितच आहे. आपल्या संस्कृतीत गायत्री माता ही स्वर्गलोकाशी कनेक्टिव्हिटी साधण्याची हातोटी सांगणारी देवता आहे. आपल्या ग्रहमालेचा स्पंद हा गायत्री माता चित्तशुद्धीतून सप्त लोकांशी संधान (कनेक्टिव्हिटी) साधत किंवा साधन देत गुरुकृपेतून मार्गशीर्षातील देवदीपावली साजरी करण्यासाठी निश्चितच मार्गस्थ करेल..तरुणांना अनुकूल कालखंडमेष : सप्ताहातील बुधभ्रमणाची स्थिती व्याधिग्रस्तांना दखलपात्र अशीच राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ अमावस्येला धरून आरोग्यविषयक बाबीत परिणाम दाखवू शकतो. बाकी सप्ताह शुक्रभ्रमणाच्या विशिष्ट स्थितीतून तरुणांना एकूणच शिक्षण, नोकरी आणि विवाह आदी घटकांतून अनुकूलच. सप्ताहाचा शेवट सुवार्तांतून मोठ्या फ्लॅशन्यूज देईल. ता. ५ व ६ हे दिवस गाठीभेटी, मुलाखतीतून मोठे मनोदय फलद्रूप होतील. पती वा पत्नीचा विशिष्ट भाग्योदय होईल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग असून कर्जमंजुरी होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना गावगुंडापासून जपावे लागेल..नोकरीत वरिष्ठांशी जपून राहावेवृषभ : अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात सुरू होणारा सप्ताह आणि रवि-शनी केंद्र योगाची पार्श्वभूमी वक्री मंगळ आणि बुध जनसंपर्कातून जपण्याचा कालखंड आहे. नोकरीत वरिष्ठांशी जपून राहावे, संशयग्रस्त वागणूक टाळावी. बाकी सप्ताहात गुरु भ्रमणाचा अंडरकरंट राहीलच. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट दैवी पाठबळातून आनंददायी ठरेल. नवपरिणितांचा भाग्योदय. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलींतून लाभ. गुरुवार आणि शुक्रवार आपल्या राशीस एकूणच प्रसन्न ठेवतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींचे एखादे हृदयशल्य जाईल. शत्रुत्व शमेल..पाकीट-बॅंकांच्या कार्डांची काळजी घ्यामिथुन : सप्ताह बुध आणि मंगळ यांच्या वक्री स्थितीतून प्रदूषणाचा राहील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींनी अन्नपाण्यातील संसर्ग जपावाच. तरुणांनी द्वाड मित्रांची संगत टाळावी. पैशाचं पाकीट व मौल्यवान कागदपत्रं किंवा बँकांची कार्ड जपून वापरावीत. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात संमिश्र स्वरूपाची फळे देईल. भावाबहिणींशी वाद टाळा, खरचटण्यापासून जपा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी शेअरबाजार जपून खेळावा. सहवासातील हट्टी स्त्रीवर्ग जपा, काळजी घ्या..अवघड कामे मार्गी लागतीलकर्क : सप्ताहात राशीत मंगळ वक्री होत आहे. वक्री बुधाच्या पार्श्वभूमीवर गर्भवतींनी काळजी घ्यावी, स्वतःला सांभाळावे. सप्ताहारंभ अपवादात्मक पार्श्वभूमीवर धावपळ करू शकतो. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी परिस्थितीचे भान ठेवून वागावं. बाकी सप्ताहातील शुक्राचे राश्यांतर आणि गुरुभ्रमणाचा अंडरकरंट ता. ५ ते ७ या काळात मोठा प्रभाव टाकेल. अवघड कामे होतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लॉटरी लागेल. तरुणांना मुलाखतीमध्ये यश मिळेल..वाहनं, उपकरणांपासून काळजी घ्यासिंह : अमावस्येच्या पार्श्वभूमीवर सुरू होणारा सप्ताह परिस्थितीचे पाठबळ देणारा नाही. प्रवासाच्या वेळा सांभाळा. नादुरुस्त वाहने जपा. विद्युत उपकरणे सांभाळा. घरातील वृद्धांच्या व्याधीकडं लक्ष पुरवा. बाकी सप्ताहात श्रद्धावंतांना गुरुची कनेक्टिव्हिटी लाभेलच. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना त्याचा उत्तम अनुभव येईल. उद्याचा सोमवार उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नवस फेडायला लावेल. मोठा पुत्रोत्कर्ष होईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात प्रवासात जपलंच पाहिजे. गर्दीची ठिकाणे सांभाळा. खरेदीत जपा..चांगल्या वार्ता कळतीलकन्या : सप्ताहात वक्री ग्रहांचे एक फिल्ड राहील. अनपेक्षित प्रसंगातून गोंधळ होऊ शकतात. उत्सव समारंभात बेरंग होऊ शकतात. अपरिचित व्यक्तीशी व्यवहार करताना सावध राहावे. विशेषतः चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहारंभीचे अमावस्येचे फिल्ड सांभाळावे. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र भ्रमणाचा स्वर उत्तम पकडता येईल. तरुणांना गुरुवारचा सूर्योदय मोठ्या सुवार्तांचा राहील. विशिष्ट स्पर्धांमध्ये चांगले यश मिळेल. विवाहविषयक बाबींचा पाठपुरावा कराच. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील गुरुवार आणि शुक्रवार मोठे फोटो फिनिश यश देतील. नोकरीतील परिस्थितीचा फायदा उठवाल..वादग्रस्त येणे वसूल होईलतूळ : सप्ताहात शुक्र भ्रमणाचा उत्तम सूर लागेल. घरात कार्य ठरतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ व ६ हे दिवस ग्रहांच्या साथसंगतीतून चांगला प्रभाव दाखवणारे, जनसंपर्कातून लाभ. होतकरू तरुणांना उत्तम संधी येतील. व्यावसायिकांना जाहिरात माध्यमातून लाभ. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे सप्ताहारंभाचे फिल्ड चोरी, नुकसानीच्या घटना घडू शकणारे. बाकी सप्ताहाचा शेवट वादग्रस्त येणे वसुली करून देणारा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ आणि शेवट नोकरीतील घडामोडीतून अस्वस्थ करू शकतो. वरिष्ठांशी गैरसमज टाळा..परदेशात चांगली नोकरी मिळेलवृश्चिक : रवि-शनी केंद्रयाेगाचे फिल्ड आणि अमावस्येच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह राहील. बाकी शुभ ग्रहांचा उत्तम अंडरकरंट राहील. बुद्धिजीवी मंडळींना त्याचा लाभ होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींंना शुक्रभ्रमणाचा स्वर वैवाहिक जीवनातून फलदायी होईल. पती व पत्नीचा अनपेक्षित भाग्योदय होईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीतील राजकारणापासून जपले पाहिजे. बाकी सप्ताहात तरुणांच्या शैक्षणिक चिंता जातील. शुक्रवार जल्लोषाचा ठरेल.ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशात उत्तम नोकरी मिळेल. मात्र सप्ताहात वृद्धांना दुखापती सांभाळाव्यात..वास्तुविषयक व्यवहारातून लाभधनु : अमावस्येच्या प्रभाव क्षेत्रात सुरू होणारा सप्ताह एकंदरीत प्रदूषणाचा राहील. कोणतेही संमोहन टाळा. शेअर मार्केटमध्ये जपून खेळा, प्रवासात वेंधळेपणा टाळा. घरातील तरुणांची मानसिकता जपा. बाकी सप्ताहात शुक्रभ्रमणाचा स्वर पकडून गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस विजयोत्सवात साजरा कराल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक व्यवहारातून लाभ होईल. नोकरीतील काही अंशी वाटणारी भीती जाईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयीन प्रकरणातून नैतिक विजय संपादन होईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ धावपळीचा प्रवास टाळावा..अविस्मरणीय काळ, मानसन्मान लाभेलमकर : सप्ताहातील ग्रहमान नोकरीत भाग्योदयाचे ठरेल. विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ होतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती मोठा विजयोत्सव साजरा करतील. हितशत्रूंना जरब बसेल. सप्ताहातील शुक्रभ्रमणाचे स्वर नव परिणितांना सद्गदित करतील. सप्ताहातील ता. ५ आणि ६ हे दिवस मोठे अविस्मरणीय राहतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची एखादी स्वप्नपूर्ती होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट मानसन्मानातून थक्क करणारा ठरेल. मात्र सप्ताहात उधार उसनवारी जपून करा..नोकरीत गटबाजी त्रासदायक ठरेलकुंभ : अमावस्येच्या प्रभाव क्षेत्रात सुरू होणारा सप्ताह आचारसंहिताच पाळायला लावेल. विशेषतः नोकरी-व्यावसायिक बाबीतून हे घडेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट मानवी उपद्रव खूप त्रास देतील. गावकीच्या प्रश्नात पडू नका. नोकरीत गटबाजीपासून सावध. सप्ताहातील रवि-शनी केंद्रयोगाची पार्श्वभूमी मंगळाच्या पार्श्वभूमीवर मोठा परिणाम करेल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय संमिश्र ग्रहमान राहील. बुद्धिजीवी मंडळीचे मोठे भाग्योदय होतील. परदेशस्थ तरुणांनी शनिवारी प्रवासात सांभाळावे, धारदार वस्तूपासून स्वतःला सांभाळा..शुभग्रहांची मदत मिळेलमीन : सप्ताह शुभग्रहांच्या अखत्यारीतील राहील. अर्थातच त्यांची गुप्त रसद पुरवली जाईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ४ ते ६ हे दिवस मोठी अजब अशी फळं मिळतील. नोकरीतले मानांकन वाढेल. तरुणांना अपेक्षित नोकरी मिळेल. मात्र सप्ताहारंभी अमावस्येच्या प्रभाव क्षेत्रात घरातील वृद्धांची मनं जपा. त्यांची काळजी घ्या. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात कामगार चिंता सतावेल. बाकी पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ चा सूर्याेदय मोठ्या सुवार्तेचा. तरुणांना नोकरीच्या मुलाखतींतून यश. प्रेमिकांची प्रेमस्पंदने प्रभावी ठरतील..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.