
व्यक्तीला सर्वत्र बघायची, सर्व गोष्टी जाणून घेण्याची कमालीची हौस असते, परंतु तो कधीही स्वतःच्या मनात डोकावून पाहत नाही. पाहण्याचा प्रयत्न केला, तरी तटस्थ वृत्तीने पाहतोच असे नाही. व्यक्तीने स्वतःला जाणून घेतल्यासच तो खऱ्या अर्थाने आयुष्यात ठामपणे उभा राहू शकतो. अर्थात त्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागतो. तो कोणता करायचा याचे मार्गदर्शन स्वाती परांजपे यांच्या या पुस्तकातून आपल्याला मिळते. सत्य, अहिंसा आणि श्रद्धा या त्रिसूत्रीवर आधारित जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला कधीही एकटेपणाची जाणीव होत नाही. मानसिक आरोग्य जपण्यासाठी ही त्रिसूत्री उपयोगाची ठरते. आयुष्यात एकटेपणा जाणवायला लागल्यास त्यातून मार्ग काढण्याचे सूत्र या पुस्तकातून आपल्याला मिळते. आयुष्यात वास्तवाचा स्वीकार करण्याची ताकद निर्माण करण्यासाठी मदतीचा हात निश्चित मिळतो. काही गोष्टी लगेच अंगीकारता येत नाही, त्याला योग्य वेळ द्यावाच लागतो. तो दिल्यास आयुष्यातील अनेक समस्यांची उत्तरे मिळतात. त्यासाठी काही तत्त्वांचा अंगीकार करावा लागतो. ती तत्त्व कोणती याची माहिती या पुस्तकातून दिली आहे.
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन, पुणे
पृष्ठे : ६० मूल्य : १०० रुपये.