
निवेदक व भाषा अभ्यासक मंजिरी धामणकर यांनी ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत वर्षभर लिहिलेल्या ‘सुभाषितरत्नानि’ या सदरातील लेखांचे हे संकलन आहे. संस्कृत सुभाषितांचा समृद्ध संग्रह लोकांपर्यंत पोहोचावा, यादृष्टीने त्यांनी हे लेखन केले आहे. विविध विषयांवरील संस्कृत सुभाषिते, त्यांचा पद्य अनुवाद आणि रसास्वाद उलगडणारे स्पष्टीकरण असे पुस्तकाचे स्वरूप आहे. प्रत्येक सुभाषिताचा पद्यमय अनुवाद वाचताना तो केवळ अनुवाद न वाटता नवे काव्य वाटावे इतका सहज झाला आहे. वाणी, क्षमा, शौर्य, मित्र, गुण अशा विविध विषयांवरील सुभाषितांसह आधुनिक सुभाषितांचाही यात समावेश आहे.
वैशिष्ट्य : संस्कृत सुभाषितांचा खजिना सहज-सोप्या भाषेत खुला करणारे लेखन.
प्रकाशक : अल्टिमेट असोसिएट्स
पृष्ठे : १४८ मूल्य : २५० रु.