
new books
sakal
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारकांबरोबरच काही सामान्य नागरिकांनीदेखील बलिदान दिले. स्वातंत्र्यलढ्यातल्या अशा अनेक अज्ञात वीरांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने ‘कथा अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या’ हा ग्रंथ प्रा. डॉ. शिवाजी म्हस्के यांनी सिद्ध केला आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे राबवण्यात आलेल्या प्रकल्पांतर्गत म्हस्के यांनी ४०० अज्ञात वीरांची माहिती मिळवून त्यांच्या कथा लिहिल्या. त्यातील बुलडाणा जिल्ह्यातील ६७ अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची माहिती व त्यांचे कार्य या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशझोतात आणण्यात आले आहे.
वैशिष्ट्य : चले जाव, असहकार, मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह ते आझाद हिंद फौजेत सहभागी असलेल्या अज्ञात वीरांची माहिती, छायाचित्रे, पत्रे, स्मारक इ. माहिती.
प्रकाशन : मिहाना पब्लिकेशन्स, पुणे
पृष्ठे : १९२ मूल्य : ३०० रु.