
new books
sakal
हिमालयापलीकडचा अपरिचित प्रदेश, अथांग हिरवीगार कुरणे, निळेभोर आकाश, गवताळ रानांवर स्वच्छंदपणे चरणारे प्राणी आणि विषम हवामानाचा प्रदेश म्हणजेच मंगोलिया! अद्भुत इतिहास, पण अवघड भूगोल असलेल्या ह्या प्रदेशातील पशुपालकांचा अभ्यास करण्यासाठी एका समाजशास्त्रज्ञाने, लेखकाने केलेली भटकंती म्हणजेच मिलिंद बोकील यांचे ‘निळे आकाश, हिरवी धरती’ हे पुस्तक! मंगोलियातील पशुपालकांच्याबरोबरीने तेथील सामान्य लोकांचे जीवन, राहणीमान, संस्कृती, खान-पान यांसह दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक बाबींचा वेध बोकील यांनी या पुस्तकात घेतला आहे.
वैशिष्ट्य : मंगोलियातील पशुपालकांच्या जीवनावर, समाजावर प्रत्यक्ष भेट देऊन केलेले लेखन व छायाचित्रे. अन्वर हुसेन यांचे मुखपृष्ठ.
प्रकाशन : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : १७८ मूल्य : ३०० रु.