

Marathi Books
sakal
डॉ. कलाम यांची स्मृतिफुले
‘मिसाइल मॅन ऑफ इंडिया’, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा देणाऱ्या लेखांचे संकलन म्हणजे ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची स्मृतिफुले’ हे पुस्तक आहे. विविध क्षेत्रातील ज्या मान्यवरांना डॉ. कलाम यांचा सहवास लाभला, त्यांनी लिहिलेल्या लेखांचे संपादन या पुस्तकात विजय आनंद चव्हाण यांनी केलं आहे. पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, संजय नहार, डॉ. दीपक शिकारपूर यांच्यासह विविध मान्यवरांच्या लेखांचा समावेश या पुस्तकात आहे.
वैशिष्ट्य : डॉ. कलाम यांच्याशी निगडित आठवणींना उजाळा देणारे लेख व मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली.
प्रकाशन : संवेदना प्रकाशन
पृष्ठे : ९० मूल्य : १२५ रु.