Video : व्हर्च्युअल रिलेशनशिप म्हणजे काय? 

love-virtual-relationship.jpg
love-virtual-relationship.jpg

मोबाईल हा आपल्या आयुष्यातील आवश्‍यक घटक बनत चालला आहे. या डिजिटल युगात आभासी नात्यात राहायला अनेकांना आवडते. परंतु, आजच्या डिजिटल युगात कंफर्टेबल वाटणारं नातं तेवढं सुरक्षित असतं का? या आभासी जगात वावरताना कोणती काळजी घ्यावी, तसेच त्यातून निर्माण झालेल्या नात्याचे विविध कंगोरे जाणून घेण्याबाबत ‘मोकळे व्हा’च्या डिजिटल पुरवणीअंतर्गत आयोजित फेसबुक लाइव्हमधून मार्गदर्शन करण्यात आले होते. व्हर्च्युअल रिलेशनशिपबद्दल आलेल्या विविध प्रश्‍नांवर भारती विद्यापीठातील न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. भाग्यश्री देशपांडे यांनी इथे उत्तर दिली आहेत.

मी २४ वर्षांची तरुणी आहे. गेले सहा महिने व्हर्च्युअल रिलेशनशिपमध्ये आहे. मी अनेकदा माझ्या फेसबुक फ्रेंडला भेटण्याचा आग्रह केला. पण, तो कारणे देत टाळत आहे. मी हे रिलेशन पुढे न्यावेत का? 
- तो मुलगा भेटायला तयार नाही, तर यामध्येच त्या मुलाला फ्रेंडशिप निभवण्यात काहीही इंटरेस्ट नाही, हे दिसते. तो मुलगा तुमच्या मैत्रीचा गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे हे रिलेशन पुढे नेण्यात काही अर्थ नाही. तो मुलगा खरा असल्यास भेटायला होकार देईल. अन्यथा, हे नाते इथेच थांबवणे आवश्‍यक आहे. 

मी माझ्या फेसबुकच्या फ्रेंडसोबत व्हिडिओ चॅटवर बोलते. अनेकदा मी बोल्ड अवस्थेत त्याच्यासमोर असते. त्यालाही ते आवडते. पण, तो नेहमी अंधारात व्हिडिओ कॉल करतो. यामध्ये तो मला व्यवस्थित दिसत नाही. मी मात्र त्याला पूर्ण दिसत असते. हल्ली मला शंका येते, की तो माझ्याशी व्हिडिओ चॅटवर बोलत असताना एकटा नसतो, तर त्याच्यासोबत आणखीही काही मित्र असतात. मला आता याची जास्तच भीती वाटत आहे. 
- समोरची व्यक्ती अंधारात बसून चॅटिंग करते, ही बाब तुझ्या आधीच लक्षात यायला हवी होती. तू समोरच्या व्यक्तीला संपूर्ण दिसत होतीस. परंतु, समोरची व्यक्ती तुला दिसत नव्हती. तू तेव्हाच त्याची चौकशी करून त्याला उजेडात येण्याची मागणी करायला हवी होती. आता मात्र ताबडतोब हे नाते इथेच थांबवायला हवे. नाही तर हे नाते विकोपाला जाऊ शकते. ब्लॅकमेलिंगसारखे प्रकार तुझ्यासोबत घडू शकतात, त्यामुळे यापुढेही दक्षता घ्यावी. 

अनेक मुले-मुली शिक्षण तसेच नोकरीसाठी बाहेर राहतात. तेव्ही त्यांना बोलायला कुणी नसते. अशावेळी त्यांनी व्हर्च्युअल रिलेशनशिपमध्ये असावे का? 
- एकटेपणा हा काही प्रमाणात व्हर्चुअल रिलेशनशिपमध्ये दूर होऊ शकतो. परंतु, त्यात धोके खूप असतात. त्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांशी, कलिगशी चांगले रिलेशन ठेवावेत. यामुळेही एकटेपणा दूर होऊ शकतो. एकटेपणाला व्हर्च्युअल रिलेशनशिप हा पर्याय होऊ शकत नाही, त्यातले धोकेही तुम्ही जाणून घेतले पाहिजेत. आपला एकटेपणा दुसरे कोणी दूर करू शकत नाही, तो स्वतःहूनच दूर केला पाहिजे. आपल्याकडे करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी/छंद असतात. त्यामध्ये मन रमवल्यास एकटेपणाला वेळच मिळत नाही. 

मी २६ वर्षांचा तरुण आहे. आम्ही दोघे व्हर्च्युअल रिलेशनशिपमध्ये होतो. प्रत्यक्ष भेटलो तेव्हा माझा अपेक्षाभंगच झाला. तिने फोटो दुसरीचाच ठेवला होता. मी ते नाते तोडण्याचा प्रयत्न करतोय. पण, आता ती माझ्या मागे लागलीय... मी कशी सुटका करून घेऊ? 
- तू त्या मुलीला समजावून सांगणे गरजेचे आहे. तुमचे आज पटत नसल्यास पुढे जाऊन अनेक वाद होऊ शकतात, ही गोष्ट तिच्या लक्षात आणून दे. असे केल्यासही ती तुला सोडायला तयार नसल्यास अथवा ब्लॅकमेल करीत असल्यास सायबर सेलला तक्रार करण्याचा पर्याय आहे. व्हर्च्युअल रिलेशन हे कधीच अक्च्युअल असू शकत नाही. ते अक्च्युअलमध्ये आपण आणतो, तेव्हा काही गोष्टींबाबत अपेक्षाभंग हा ठरलेलाच असतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com