
गौरी देशपांडे- gaurisdeshpande1294@gmail.com
एक होतं बांबूचं वन. त्यात अनेक भूतंखेतं होती. त्यांच्यातच होती एक जोखिणी. तिचं नाव जोखू. तिच्या नावावर जाऊ नका हं! त्या सर्व भूतांमध्ये सगळ्यांत भयानक होती जोखू! सगळ्यांना घाबरवण्यात तिला खूपच आनंद मिळत असे. तिचा दिनक्रमच बघा ना.