

Why Driving Systems Differ Across Countries
sakal
वाहनांच्या तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल होत असताना भारतात आणि अमेरिकेत वाहन चालविण्याची पद्धत मात्र एकसारखी किंवा एकसमान का नाही, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे, दीडशेहून अधिक देशांत लेफ्ट हँड ड्राइव्ह प्रणाली असून ७५च्या आसपास देशांत राइट हँड ड्राइव्ह प्रणाली आहे. वाहनांचे फीचर्स, इंजिन क्षमता, बॅटरी यासारख्या साधनांत सारखेपणा असताना जगभरातील वाहनांचा येण्याचा आणि जाण्याचा मार्ग एक का नाही, असा विचार मनात येऊ शकतो.