
Pet Dog Story
sakal
गौरी देशपांडे- gaurisdeshpande1294@gmail.com
तुम्हाला ते पत्र्याचं खोपटं दिसतंय? ते आहे यास्मिनचं आणि तिच्या कुटुंबाचं घर. त्यांचं हे घर उन्हाळ्यात खूप तापतं आणि हिवाळ्यात बर्फासारखं थंड पडतं. पावसाळ्याचं तर विचारूच नका! जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा हजारो बोटं आपल्या डोक्यावर टपल्या मारताहेत असं यास्मिनला वाटतं.