
डॉ. विनोद सिनकर-editor@esakal.com
कुतूहल, जिज्ञासा हा बालकाचा स्थायिभाव असतो. मुलांना आजूबाजूच्या अनेक गोष्टींबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असते, त्यामुळे बालकांच्या मनात नानाविध प्रश्न फेर धरून नाचत असतात. ही मुलं प्रश्न विचारून मोठ्यांना अक्षरशः भंडावून सोडतात. मात्र त्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरं योग्य पद्धतीने मुलांना मिळाली तर मोठे आणि मुलं यांच्यातला संवाद कसा वाढत जातो, याची अनुभूती ‘झिब्राच्या कथा’ या कथासंग्रहातून येते. त्यामुळे बालकांबरोबर मोठ्यांनीही हा कथासंग्रह वाचायला हवा, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.