
सातारा : खिंडवाडी परिसरात विक्रीसाठी आणलेला सुमारे दोन लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचा १० किलो गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केला. याप्रकरणी अतुल धनाजी भगत (रा. गणेश चौक, कोडोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार अमित तानाजी मोरे यांनी फिर्याद दिली आहे.