Satara Fraud : 'शेअर मार्केटच्या नावाखाली ११ जणांची ३८ लाखांची फसवणूक'; नाशिकच्या एकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Share Market Investment Turns Fraud: शाहीनाथ पारुजी घोलप (रा. इंदिरानगर, नाशिक) असे त्यांचे नाव आहे. याबाबत कैलास हणमंतराव धुमाळ (वय ६०, रा. सदरबझार) यांनी फिर्याद नोंदविली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास पैसे दिल्यास दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष घोलप याने धुमाळ यांना दाखविले होते.
सातारा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास पैसे दिल्यास दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून ११ जणांची तब्बल ३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या एकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.