
सातारा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४५ गावे, २९८ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माण तालुक्यानंतर आता पाटण, वाई, कोरेगाव तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. माण तालुक्यात सर्वाधिक ४२ गावे व २९१ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.