esakal | सावधान! तिसऱ्या लाटेबाबत धोक्याची घंटा; जावळीत 13 मुलांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा इशारा शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

सावधान! तिसऱ्या लाटेबाबत धोक्याची घंटा; जावळीत 13 मुलांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
महेश बारटक्के

कुडाळ (सातारा) : जावळीत गेल्या आठवड्यात कोरोना बाधितांचा (Corona Patient) वेग मंदावला होता. मात्र, या आठवड्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा काहीशी वाढ होऊ लागली आहे. आता कोरोनाची लहान मुलांकडे (Little Children) वक्रदृष्टी पडली असल्याने काळजी वाढली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा इशारा शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. आजच्या अहवालात तालुक्यात दहा वर्षांच्या आतील आठ मुलांचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. (13 Children Infected With Coronavirus In Nevekarwadi Village In Jawali Taluka)

नेवेकरवाडी (ता. जावळी) येथे कोरोनाचा हाहाकार सुरू झाला असून जेमतेम चारशेच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या नेवेकरवाडीत गेल्या आठ दिवसांत ३०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये तब्बल ८५ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह (Corona positive) आला आहे. यात दहा वर्षांच्या आतील तेरा लहान मुलांचा समावेश आहे. जावली आरोग्य विभागाच्या (Jawali Health Department) माध्यमातून नेवेकरवाडीत घराघरांत सर्व्हे सुरू आहे. कोरोना बाधितांची संख्या जास्त असली तरीही सर्वांची प्रकृती ठीक आहे. दाट लोकवस्ती आणि सध्या शेतीच्या कामासाठी एकत्रित येण्यामुळे संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. येथील कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे (Group Development Officer Satish Buddhe) यांनी दिली.

हेही वाचा: बामणोली-तापोळ्याला स्पीडबोट ॲम्बुलन्‍स द्या; खासदार पाटलांच्या 'आरोग्य'ला सूचना

जावली तालुक्यात ता. १५ रोजी घेण्यात आलेल्या स्वॅब व ता. १६ रोजी घेण्यात आलेल्या अन्टीजेन टेस्टमध्ये ५३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. यामध्ये नेवेकरवाडी येथील २६ जणांचा समावेश आहे. आज २२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आजअखेर २२२ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात २७७ अॅक्टिव्ह कोरोना बाधित आहेत. आजच्या अहवालात हुमगांव येथील एक वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. तसेच नेवेकरवाडी येथील दहा वर्षांच्या आतील सात बालकांचा समावेश आहे. आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे : सावरी १, सावली ३, दापवडी १, हुमगांव ३, खर्शी, कुडाळ ३, महू १, पिंपळी १, रांजणी २, शेते १, सोमर्डी १, वागदरे १, भिवडी १, मार्ली ६, नेवेकरवाडी २६, रानगेघर १, सांगवी (सोनगाव) १ असे एकूण ५३ जण बाधित आहेत.

13 Children Infected With Coronavirus In Nevekarwadi Village In Jawali Taluka

loading image
go to top