बामणोली-तापोळ्याला स्पीडबोट ॲम्बुलन्‍स द्या; खासदार पाटलांच्या 'आरोग्य'ला सूचना

MP Shrinivas Patil
MP Shrinivas Patilesakal

कास (सातारा) : कोयना धरण (Koyna Dam) परिसरातील बामणोली-तापोळासह अन्य गावांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सर्व सुविधांनीयुक्त स्पीडबोट ॲम्बुलन्स (Speed Boat Ambulance) व आरोग्य सेवकपदांची उपलब्धता करण्याच्या सूचना खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त एन. रामास्वामी (Commissioner N. Ramaswamy) यांना केल्या आहेत. (MP Shrinivas Patil Instructs Commissioner N Ramaswamy To Provide Speed Boat Ambulance For Bamnoli-Tapola Villages)

Summary

पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य सुविधा पुरविताना मोठ्या अडचणी निर्माण होत असतात.

खासदार पाटील यांनी याबाबत पत्र लिहिले असून, त्यात म्हटले आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) व आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांच्या उपस्‍थितीत सातारा येथे कोविड-१९ ची आढावा बैठक पार पडली. त्यात झालेल्या चर्चेनुसार बामणोली-तापोळा शिवसागर जलाशयात (Shivsagar Reservoir) स्पीडबोट ॲम्बुलन्स व आरोग्य सेवेकरिता पदांची उपलब्धता करण्याबाबतचा प्रस्ताव सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दहा जून रोजी तयार करून आपल्या विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

MP Shrinivas Patil
उदयनराजेंचा सरकारला अल्टिमेटम; 'मराठा आरक्षणा'साठी केल्या 6 मागण्या

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या दोन्ही तीरांवर तापोळा, अहीर, रूळे, गावडोशी, आवळण, कोट्रोशी, खरोशी, शिरनार, देवळी, झांजवड, दाभेमोहन, दाभे, दुधगाव, आमशी, हरचंदी, कळंब, वेळापूर, पाली, तेटली, आपटी, निपाणी फुरूस, वाकी, रामेघर, वारसोळीदेव, गोगवे, लाखवड, देवसरे, येर्णे, सोनाट, खांबील, दरे, तांब, अकणी, कुसापूर, निवळी, रवंदी, आडोशी, माडोशी, लामज, कांदाट, वाघवळे, खिरकंडी, चकदेव, मोरणी, वलवन, शिंदी, शेंबडी, वाघळी, काकोशी, वासोटा, अंबवडे, कारगाव, कालेवाडी, पिसाणी, ढेंन, मायणी, तळदेव, कुसवडे, वनकुसवडे अशी या भागातील सुमारे ६० गावे दुर्गम व डोंगराळ भागात विखुरली आहेत.

MP Shrinivas Patil
'कृष्णा'त काँग्रेसची मते विभागणार; मंत्री कदमांनंतर उंडाळकरांची भूमिका जाहीर
Speed Boat Ambulance
Speed Boat Ambulanceesakal

या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य सुविधा पुरविताना मोठ्या अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे शिवसागर जलाशयाच्या दोन्ही तीरांवरील नमूद केलेल्या गावांतील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा वेळेत पुरविण्याच्यादृष्टीने दोन स्पीडबोट ॲम्बुलन्स पथके कार्यान्‍वित करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेतर्फे आपणाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजुरी देऊन बामणोली-तापोळा येथे सर्व सुविधांनीयुक्त स्पीडबोट ॲम्बुलन्स व आरोग्य सेवेकरिता पदांची उपलब्धता करण्याबाबतच्या प्रस्तावास तत्त्‍वत: मान्यता द्यावी.

MP Shrinivas Patil Instructs Commissioner N Ramaswamy To Provide Speed Boat Ambulance For Bamnoli-Tapola Villages

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com