esakal | झेडपीत 137 कर्मचाऱ्यांना पदोन्नती; 'आरोग्य'तील 60 जणांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

Zilla Parishad

यामध्ये आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, अर्थ विभाग, ग्रामपंचायत विभाग, सामान्य प्रशासनासह इतर काही विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

झेडपीत 137 कर्मचाऱ्यांना पदोन्नती; 'आरोग्य'तील 60 जणांचा समावेश

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) विविध विभागांतील वर्ग तीन व वर्ग चारमधील १३७ कर्मचाऱ्यांना विविध विभागांत पदोन्नती देण्यात आल्या आहेत. त्यामधील सर्वाधिक आरोग्य विभागातील (Health Department Satara) ६० कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेत गेल्या सहा महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्या आहेत. (137 Employees Of Zilla Parishad Promoted In Various Departments bam92)

त्यामध्ये आरोग्य विभाग, बांधकाम विभाग (Construction Department), अर्थ विभाग, ग्रामपंचायत विभाग (Gram Panchayat Department), सामान्य प्रशासनासह इतर काही विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सहायक प्रशासन अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता व इतर पदांवर पदोन्नती देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या पदोन्नतीमध्ये सामान्य प्रशासन विभागात दोन कर्मचाऱ्यांची कनिष्ठ प्रशासन अधिकारीमधून सहायक प्रशासन अधिकारीपदी, सात कर्मचाऱ्यांची वरिष्ठ सहायकमधून (प्रशासन) कनिष्ठ प्रशासन अधिकारी, २० कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहायकमधून वरिष्ठ सहायक (प्रशासन), नऊ कर्मचाऱ्यांना शिपाई परिचरमधून कनिष्ठ सहायकपदी (प्रशासन) पदोन्नती देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: तीन आमदार, एक खासदार असूनही 'राष्ट्रवादी'ला मिळेना 'जिल्हाध्यक्ष'

तसेच पशुसंवर्धन विभागात आठ कर्मचाऱ्यांना पशुधन पर्यवेक्षकमधून सहायक पशुधन विकास अधिकारीपदी नियुक्ती, आरोग्य विभागात ३५ आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांना आरोग्य सहायकपदी नियुक्ती, २५ आरोग्य सहायकांना आरोग्य पर्यवेक्षकपदी पदोन्नती, बांधकाम विभागात पाच कर्मचाऱ्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहायकमधून कनिष्ठ अभियंतापदी नियुक्ती, एक कर्मचारी आरेखकमधून कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ आरेखकमधून एक कर्मचारी आरेखक, तर एक कर्मचारी अनुरेखकमधून कनिष्ठ आरेखकपदी नियुक्ती, अर्थ विभागात आठ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहायक लेखामधून वरिष्ठ सहायक लेखापदी नियुक्ती, दोन कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहायक लेखामधून कनिष्ठ लेखाधिकारी, एक कर्मचारी कनिष्ठ लेखाधिकारीमधून सहायक लेखाधिकारीपदी नियुक्ती, ग्रामपंचायत विभागात दहा ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारीपदी नियुक्ती, दोन ग्रामविकास अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारी कृषी म्हणून पदोन्नती देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: 143 किमी सायकलिंग, मिनटात 100 पुशअप्स मारणारी 'सुपरगर्ल'

जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील १३७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्या आहेत. या पदोन्नतीमध्ये वर्ग तीन व वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

-मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, जिल्हा परिषद

137 Employees Of Zilla Parishad Promoted In Various Departments bam92

loading image