Good News : जलजीवन योजनेत साताऱ्यातील 148 गावांचा समावेश

Jal Jeevan Mission Scheme
Jal Jeevan Mission Schemeesakal

कऱ्हाड (सातारा) : जलजीवन मिशन योजनेंतर्गत (Jal Jeevan Mission Scheme) २९ गावांना निधी कालच मंजूर झाला आहे. त्या योजनेच्या आराखड्यात जिल्ह्यातील आणखी १४८ गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्यांनाही लवकरच निधी मिळणार आहे. जलजीवन मिशननुसार ग्रामीण भागात सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत घरोघरी नळ योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यास केंद्र शासन (Central government) कटिबद्ध आहे. राज्य शासनाच्या (Government of Maharashtra) सहकार्याने ही योजना राबवली जात आहे. त्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातील (Satara LokSabha constituency) कामे कार्यान्वित करण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. (148 Villages In Karad Are Included In Jal Jeevan Scheme Satara Marathi News)

Summary

जलजीवन मिशन योजनेंतर्गत २९ गावांना निधी मंजूर झाला आहे. त्या योजनेच्या आराखड्यात जिल्ह्यातील आणखी १४८ गावांचा समावेश झाला आहे.

योजनेच्या आराखड्यात समाविष्ट गावांची माहिती अशी, पाटण तालुका- लोटलेवाडी- काळगाव, कसणी, धायटी, कोचरेवाडी, डेरवण- बोर्गेवाडी, केळोली वरची, केळोली खालची, पाडळोशी- नारळवाडी, गलमेवाडी, मारुल हवेली, रुवले-पाटीलवाडी, पापर्डे बुद्रुक, गुढे, कोरिवळे, दिवशी बुद्रुक, गुढे- शिबेवाडी, दिंडेवाडी, नानेगाव बुद्रुक, सडावाघापूर, कुंभारगाव, काळगाव-येळेवाडी, निसरे, दिवशी खुर्द-मराठवाडी, दिवशी खुर्द- जुंगटी, ताईगडेवाडी-तळमावले, नाणेगाव खुर्द, धामणी, कडवे बुद्रुक, महाबळवाडी-दाढोली, टोळेवाडी-पिंपळोशी, तोंडोशी, पाचगणी, सणबूर, मालदन- सुतारवाडी, काठीटेक, अंबवडे खुर्द, ढेबेवाडी, सातर, वाघजाईवाडी, बहुले, विहे, मंद्रुळ हवेली, बनपुरी, घोटील, झाकडे, घाणव, येराड, धडामवाडी, वजरोशी, गुढे- शिद्रुकवाडी, येरफळे, मानेवाडी काळगाव, चिखलेवाडी, कोंजवडे, जांभेकरवाडी-धनगरवस्‍ती, मारुल तर्फ पाटण, काहीर, ढोरोशी-शिवपुरी, ढोरोशी, सुपुगडेवाडी, घोटील, चाळकेवाडी, सावरघर, बोर्गेवाडी-घोट, चाफोली, भुडकेवाडी, धामणी-बौद्धवस्ती, आचरेवाडी-काळगाव मातंगवस्‍ती, करपेवाडी, रामिष्‍टेवाडी-काळेवाडी, साईगडे, कुंभारगाव, आटोली.

Jal Jeevan Mission Scheme
धक्कादायक! लसीकरण मोहिमेत 'घोटाळा', अनेकांकडून पदाचा गैरवापर

कऱ्हाड तालुका- हनुमानवाडी, तारुख, कांबीरवाडी, वाघेश्‍वर, कोरिवळे, हेळगाव, रेठरे खुर्द, नवीन कवठे, अंधारवाडी, सवादे, शामगाव, गोंदी वानरवाडी, तासवडे, वनवासमाची, कामथी, बेलवडे हवेली, कळंत्रेवाडी, पाडळी-केसे, चरेगाव, खालकरवाडी, म्‍हासोली, शिंदेवाडी-विंग, गोटेवाडी, गोटे, शिरगाव, घोणशी कोणेगाव, कालवडे, बेलवडे बुद्रुक, शिवडे, मांगवाडी-उंब्रज, धोंडेवाडी- मस्‍करवाडी, येरवळे. खटाव तालुका- रहाटणी शिंदेवाडी कटगुण, ललगुण, चोराडे, पुसेसावळी. कोरेगाव तालुका- अंभेरी, जायगाव, न्‍हावी बुद्रुक, अंबवडे, बोरगाव, काळोशी, वाठार किरोली, कोंबडवाडी, भाकरवाडी, भंडारमाची, बोबडेवाडी, शिरंबे, चोरांबे, आसगाव. सातारा तालुका- पोगरवाडी, चिंचनेर स. निंब, खोजेवाडी, करुळबाजी, कुरळोशी, धावडशी, देगाव, मांडवे, सारखळ, अंगापूर-तारगाव, आरे तर्फ परळी, करंडी, पांगारे, भाटमरळी, सोनवडी, तासगाव अंतर्गत ब्राहणवाडी व मुळीकवाडी. खंडाळा तालुका- कोपर्डे, वाई तालुका- वेळे, चांदक, शिरगाव, केंजळ यांचा समावेश आहे.

148 Villages In Karad Are Included In Jal Jeevan Scheme Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com