धक्कादायक! लसीकरण मोहिमेत 'घोटाळा', अनेकांकडून पदाचा गैरवापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

जिल्ह्यातील कोरोना लशीच्या कमतरतेमुळे रात्रीपासून नागरिकांना रांगा लावाव्‍या लागत आहेत.

धक्कादायक! लसीकरण मोहिमेत 'घोटाळा', अनेकांकडून पदाचा गैरवापर

सातारा : जिल्ह्यातील कोरोना लशीच्या (corona vaccination) कमतरतेमुळे रात्रीपासून नागरिकांना रांगा लावाव्‍या लागत आहेत. परंतु, राजकीय व प्रशासकीय ओळखीतून होणाऱ्या टोकण घोटाळ्यामुळे टोकण मिळण्याठी रांगा लावणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मात्र परवड होत आहे. त्यामुळे टोकणच्या योग्य वाटपाबाबत जिल्ह्यातील केंद्रांवर (corona care center) योग्य कार्यपद्धती लावणे अत्यावश्यक बनले आहे. (Corruption In Corona Vaccination Campaign In Satara District)

मार्च महिन्यापासून जिल्ह्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. आठ दिवसांपूर्वी प्रशासनाने जिल्ह्यात लावलेले निर्बंध शिथिल केले. परंतु, चाचण्या व बाधित सापडण्याच्या प्रमाणाची टक्केवारी पुन्हा दहाच्या वर गेल्यामुळे आजपासून पुन्हा निर्बंध आणले गेले. अत्यावश्यक वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. अत्यावश्यक सेवाही दुपारी दोनपर्यंत सुरू असेल. त्यामुळे नागरिकांची विशेषत: व्यापारी व हातावरचे पोट असणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा स्‍थितीत कोरोना लसीकरण वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, लस घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या प्रमाणात अत्यंत कमी डोस उपलब्ध होत आहेत.

हेही वाचा: आम्ही बुडून मरायची वाट बघताय का?; धरणग्रस्तांचा सरकारला सवाल

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३१ लाख आहे. त्यामध्ये शासनाच्या नियमानुसार लस घेण्यासाठी पात्र असलेल्या १८ वर्षे वयोगटातील लोकांची संख्या २१ लाख आहे. त्यापैकी आत्तापर्यंत नऊ लाख ८० हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे अजूनही दहा लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लसीकरणाची प्रतीक्षा आहे. तरीही जिल्ह्यातील आठवड्याला काही हजारांतच लस मिळत आहे. त्यातच कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे.

हेही वाचा: अंधत्वाचं दुःख बाजूला सारून दिव्यांगांनी बनविले 25 हजार 'सीडबॉल'

vaccination

vaccination

त्यामुळे पूर्वी लसीकरणासाठी नागरिक पुढे येऊ लागलेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून घेण्याची प्रशासनाला संधी आहे. परंतु, लसीकरणासाठी असलेल्या रांगांमुळे अनेकांची मानसिकता बदलू लागली आहे. लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी टोकण पद्धत सुरू केली आहे. परंतु, समन्यायी पद्धतीने या टोकण देण्याची प्रक्रिया अनेक ठिकाणी पार पडत नाही. लस देणाऱ्या आरोग्य यंत्रणा, राजकीय पदाधिकारी, अन्य प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रभावात दररोज टोकण दिली जातात. दुसरीकडे लस मिळण्यासाठी नागरिक रात्री दहा-अकरापासून लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) मुक्कामी येत आहेत. अनेक जण पहाटे चार-पाचपासून रांगेत उभे राहतात. अशा नागरिकांवर टोकण घोटाळ्यामुळे अन्याय होत आहे. अनेकांना टोकण मिळाल्यानंतरही लस संपली, असे सांगितले जाते. त्यामुळे त्या टोकणची लस दिली कुणाला, असाही प्रश्न निर्माण होतो. आरोग्य यंत्रेणेतील वरिष्ठ (Department of Health) अधिकाऱ्यांनी टोकण घोटाळा बंद करण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.

हेही वाचा: ज्या हातांना पकडलं, त्याच हातांनी पोलिसांना बंडातात्यांनी जेवू घातलं!

आकडे बोलतात...

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या- ३१ लाख

लसीकरणासाठी पात्र- २१ लाख

झालेले लसीकरण- नऊ लाख ८० हजार

Corruption In Corona Vaccination Campaign In Satara District

Web Title: Corruption In Corona Vaccination Campaign In Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top