टोल भरण्यावरुन साताऱ्यात राडा; 15 जणांची सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

Tasawade Toll Plaza
Tasawade Toll Plazaesakal
Updated on
Summary

बंगळुरु महामार्गावर टोल भरण्याच्या कारणावरुन तासवडे टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केलीय.

वहागाव : टोल भरण्याच्या कारणावरून महामार्गावरील (Banglore Highway) तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्यावर (Tasawade Toll Plaza) खासगी बस प्रवासी व टोल कर्मचारी यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. रविवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेवरून तळबीड पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, त्यानुसार 12 ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापूर येथून साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रव्हल्सचा टोल भरण्यावरुन हा राडा झाला असल्याची माहिती आहे. फास्टॅग स्कॅनिंग होत नसल्याने बाचाबाचीतून हा वाद मोठा झाल्याची माहिती आहे. 26 तारखेच्या पहाटे टोल नाक्यावरील झालेल्या या राड्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. याबाबतची तक्रार तळबीड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलीय.

Tasawade Toll Plaza
राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपचं पॅनेल; उदयनराजेंना डावलणं महागात पडणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com