

The 150-year-old British-era stone bridge on the Wita–Mahabaleshwar road, once a symbol of colonial engineering, moments before demolition.
Sakal
केळघर : काही वास्तू केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून त्या अनेक पिढ्यांच्या साक्षीदार असतात. विटा ते महाबळेश्वर या राज्यमार्गावर तब्बल १५० वर्षे अविरत सेवा देणारा, अनेक महापूर आणि वादळांमध्ये ताठ मानेने उभा राहिलेला आंबेघर तर्फ मेढा येथील ब्रिटिशकालीन पूल आज मकर संक्रांतीच्या दिवशी जमीनदोस्त करण्यात आला. एका ऐतिहासिक पर्वाचा अंत झाल्याची भावना परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.