
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सध्या सुरू असून, जिल्ह्यातून तब्बल १६ जण इच्छुकांच्या यादीत आहेत. यामध्ये सात महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रमुख नेते, आजी, माजी आमदार, खासदार यांच्याकडून तीन नावांचा पसंती क्रम मागवून घेण्यात आला आहे. त्यानुसार ज्यांच्या नावाला पसंती मिळेल त्यांनाच जिल्हाध्यक्ष पदावर संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांपैकी कोणाच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळणार याची उत्सुकता आहे.