सातारा - जिल्हा परिषदेच्या शाळांची थकीत वीजबिले शाळांनी भरायची की ग्रामपंचायतींच्या १५ व्या वित्त आयोगातून भरायची या गोंधळात झेडपी शाळांचे तब्बल ५० लाखांहून अधिक वीजबिल थकीत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील एक हजार ६११ शाळांचे मागील काही महिन्यांचे बिल भरले नाही. यावर मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत वीजबिले न भरल्यास वीज बंद करण्याचा इशारा महावितरण विभागाने दिला आहे.