esakal | उंब्रज, मसूर, चाफळला 162 मोटरसायकल जप्त; कऱ्हाडात पोलिसांची धडक कारवाई

बोलून बातमी शोधा

Police
उंब्रज, मसूर, चाफळला 162 मोटरसायकल जप्त; कऱ्हाडात पोलिसांची धडक कारवाई
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंब्रज (सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कडक करण्यात आल्याने आज येथे शुकशुकाट होता. पोलिसांनी उंब्रजचे अंतर्गत रस्ते बॅरिगेट्सनी बंद केले. मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करुन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांवर धडक कारवाई करत 72 दुचाकी जप्त केल्या. 51 दुचाकी स्वारांकडुन दहा हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्यां 21 नागरीकांकडून दहा हजार 500 रुपये दंड वसुल झाला. (162 Motorcycles Seized By Police In Umbraj Masur Chaphal Satara News)

मसूर : दोन दिवसात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 100 पर्यंत गेला. लोकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याने रुग्णांची संख्या वाढली. रुग्णांची साखळी तोडण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी 40 दुचाकी जप्त केल्या. जुन्या बसस्थानक चौकासह पंढरपूर, कऱ्हाड, उंब्रज, कोरेगाव रस्त्यावर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

Bed, Ventilator अभावी मरताहेत माणसं; प्रशासन आणखी किती जणांचा बळी घेणार?

चाफळ : पोलिसांनी विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांसह सोशल डीस्टन्स नियम न पाळणाऱ्यावर कारवाई केली. 50 दुचाकी वाहनावर कारवाई करून दंड वसूल केला. त्यामुळे अनेकांची चांगलीच पंचाईत झाली होती. बाजारपेठ रस्ता, पडळोशी व जळगेवाडी रस्ता येथे पोलीस बंदोबस्त आहे.

मल्हारपेठ : ठोमसे गावची साखळी तुटता तुटेना अशी स्थिती आहे. रुग्णसंख्या अर्धशतकापार झाली आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडुन आजपासुन पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत. विनाकारण रस्त्यावर विनामास्क फिरणारास 500 रुपये भरावे लागणार आहेत. ग्रामसमिती व आरोग्य पथकाकडुन कडक कारवाई करण्यात येत आहे. गावात जंतुनाशकाची फवारणी करण्याची मागणी होत आहे.

162 Motorcycles Seized By Police In Umbraj Masur Chaphal Satara News