esakal | Bed, Ventilator अभावी मरताहेत माणसं; प्रशासन आणखी किती जणांचा बळी घेणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Bed

Bed, Ventilator अभावी मरताहेत माणसं; प्रशासन आणखी किती जणांचा बळी घेणार?

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : कोरोना (Corona) बाधित रुग्णांना बेड मिळत नाही, रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाही, व्हेंटिलेटर बेड तर नाहीच नाही अशी सद्यस्थिती जिल्ह्यातील आहे. रुग्णसंख्या मोठी आणि बेडची संख्या कमी अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे कोणत्याही कोव्हिड हॉस्पिटलला (Covid Hospital) फोन केला की बेड शिल्लक नाहीत, असे सांगितले जात आहे. बेड आणि आवश्यक उपचाराअभावी माणसं मरत आहेत. काही जणांचे उपचाराअभावी घरीच जीव गेले आहेत. त्यामुळे आणखी किती जीव गेल्यावर यंत्रणा जागी होणार? हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. (Patient Death Due To Lack Of Bed Injection Ventilator Satara News)

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका रुग्णांना बसत आहे. मागील वर्षापेक्षा बाधीत होण्याचे प्रमाण दुप्पट-तिप्पट जास्त आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या रुग्णांची संख्या मोठी आणि हॉस्पिटलच्या बेडची संख्या कमी अशी स्थिती झाली आहे. परिणामी, अनेक रुग्णांना बेड मिळने दुरापास्त झाले आहे. सध्या कोणत्याही हॉस्पिटलला फोन केला की बेड शिल्लक नाहीत, असे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णांना सर्व हॉस्पिटलच्या दारात नेवूनही बेड नसल्याने हताश होवून घरी घेवून जाण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही.

रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; 'हवामान'चा अंदाज

परिणामी, तळबीडमधील तीन रुग्णांसह जिल्ह्यातील काही जणांचे घरीच उपचाराविना जीव गेले आहेत. त्याचबरोबर सध्या उपचारासाठी अॅडमिट असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमधून रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणायला सांगितले जात आहे. त्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा असल्याने आयसीयू व ऑक्सिजन बेडच्या ३५ टक्के प्रमाणे शासनाकडून त्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी फरफट होत आहे. त्यामुळे बेड मिळाला तरही इंजेक्शनचा भुंगा आणि बेड नाही मिळाला तरी रुग्णाच्या जीवाला घोर अशीच स्थिती सध्या झाली आहे.

सावधान! मेरुलिंग घाटातून प्रवास ठरतोय जीवघेणा; वाहनांवर कोसळताहेत दरडी

दुसऱ्या लाटेत लाखांवर बाधित

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आत्तापर्यंत एक लाख सात हजार ४७२ रुग्ण बाधित झाले आहेत. तर दोन हजार ५७४ कोरोना बांधितांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ६८ कोव्हिड हॉस्पिटलमध्ये तीन हजार ३५ बेडची संख्या असून त्यातील आयसीयू आणि ऑक्सिजन दोन हजार १४२ बेड आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या जास्त आणि बेड कमी अशी स्थिती आहे.  

Patient Death Due To Lack Of Bed Injection Ventilator Satara News

loading image