काेण म्हणतं पालिकेच्या शाळा रद्दड, शिष्यवृत्तीत वाईचे 17 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

भद्रेश भाटे
Thursday, 3 December 2020

शाळेने 11 वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 'टॅलेंट बॅच' हा उपक्रम सुरू केला. त्याअंतर्गत आजपर्यंत 135 विद्यार्थ्यांनी जिल्हा, तर 9 विदयार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत यश मिळविले.

वाई ( सातारा) : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील विठ्ठलराव जगताप पालिका शाळेतील (क्र. पाच) 17 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. त्यामध्ये 12 मुली व 5 मुलांचा समावेश आहे. वेदश्री जाधव हिने 260 गुणांसह राज्य गुणवत्ता यादीत 16 वा क्रमांक प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

हे ही वाचा : कोरोनाच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलची कौतुकास्पद कामगिरी

या परिक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्नेहल तरडे (39 वी), स्वरा मोरे (42), मनस्वी महामुनी (54), हर्षदा गोळे (87), श्रावणी अडसूळ (98), प्रियल भोसले (115), अनुष्का धापले (133), करण पिसे (166), साक्षी पवार (141), अशर्व नेवसे (160), मणिमर्णिका ताठे (166), शामली मोहिते (176), आर्यन कदम (180), शुभम कोंढाळकर (181), वैष्णवी धायुगुडे (183), रुद्रनील भोसले (191) यांचा समावेश आहे.
 
शाळेने 11 वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 'टॅलेंट बॅच' हा उपक्रम सुरू केला. त्याअंतर्गत आजपर्यंत 135 विद्यार्थ्यांनी जिल्हा, तर 9 विदयार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत यश मिळविले. शिष्यवृत्तीच्या या चढत्या आलेखामुळे शाळेच्या पटाची संख्या 836 येऊन पोचली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसह वरिष्ठ मुख्याध्यापिका कांताबाई खडसरे, वर्ग शिक्षक विकास घोणे, नवनाथ शिंदे, रंजना गेडाम, शोभा शिंदे यांचे आमदार मकरंद पाटील, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, समितीच्या अध्यक्षा निर्मला चोरगे, सर्व पालिका पदाधिकारी, अधिकारी, शाळा व्यवस्थापनच्या सदस्यांनी अभिनंदन केले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 students have secured a place in the merit list in the pre upper primary scholarship examination of Vitthalrao Jagtap Palika School at Wai