कोरोनाच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलची कौतुकास्पद कामगिरी

Three thousand patients have been released from Krishna Hospital, a boon for corona patients in western Maharashtra. 3.jpg
Three thousand patients have been released from Krishna Hospital, a boon for corona patients in western Maharashtra. 3.jpg

कऱ्हाड (सातारा) : पश्‍चिम महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आजपर्यंत तीन हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

सातारच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा मोठा कहर झाला. मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण वाढत असतानाच कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीसाठी योगदान दिले. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 'कृष्णा'च्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू झालेल्या उपचारांमुळे 18 एप्रिल रोजी पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर 'कृष्णा'मध्ये कोरोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली.

दिवसेंदिवस कोरोनामुक्तीचा आकडा वाढत असताना तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या उपचाराने आज कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचा तीन हजारांचा टप्पा पूर्ण केला. दोन कोरोनामुक्त रुग्णांना आज डिस्जार्च देण्यात आला. कोरोनामुक्त रुग्णांचा सत्कार कृष्णा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.ए.वाय. क्षीरसागर, सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. विश्वास पाटील, रोहिणी बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. 

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा हॉस्पिटलमध्ये एकावेळी कोरोनाचे 500 हून अधिक पेशंट असायचे. पण, सुदैवाने आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. लोकांनी लशीची वाट पाहण्यापेक्षा आणि दुसऱ्या लाटेची भीती बाळगण्याऐवजी स्वत:च्या काळजीकडे अधिक लक्ष द्यावे. मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझरच्या वापराकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com