
म्हसवड : वरकुटे- म्हसवड येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख ७२ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सात संशयितांना अटक केली आहे. याप्रकरणी धनाजी रामचंद्र कोके, सत्यवान रामहरी चव्हाण, गणेश भास्कर चव्हाण, सुनील दत्तात्रय माने, भास्कर भानुदास चव्हाण, दादा भानुदास चव्हाण व सूरज जगन्नाथ लोखंडे (सर्व जण रा. बनवस्ती वरकुटे- म्हसवड) अशी संशयितांची नावे आहेत.