esakal | बनपुरीत 'उत्पादन शुल्क'ची धडक कारवाई; 18 दारु बॉक्ससह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

State Excise Department

उत्सव काळात हातभट्टी दारु, ताडी व अवैध मद्य चोरटी वाहतूक व विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आलीय.

बनपुरीत 'उत्पादन शुल्क'ची धडक कारवाई

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) भरारी पथकानं अवैध दारूची वाहतूक रोखली. बनपुरी (ता. पाटण ) येथे आज सकाळी ही कारवाई झाली. त्यात पथकाने तब्बल १५६ लिटर देशी दारूचे १८ बॉक्स जप्त केले आहेत. त्यात एका चारचाकीसह तब्बल पाच लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय.

उत्पादन विभागाचे उप-निरीक्षक शिरीष जंगम, भीमराव माळी, विनोद बनसोडे यांनी कारवाई केली. उत्सव काळात अशीच कारवाई केली जाईल, असेही उपनिरीक्षक जंगम यांनी सांगितले. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्सव काळात हातभट्टी दारु, ताडी व अवैध मद्य चोरटी वाहतूक व विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आली आहे. त्या विरोधात विशेष माहीम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा: इसिसनं मला फसवलं, बरबाद केलं

त्यानुसार विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार यांनी विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार येथील राज्य उत्पादन शुल्क कऱ्हाडच्या विभागीय पथकाने बनपुरी (ता. पाटण) येथे सापळा रचून कारवाई केली. त्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून चारचाकी वाहन जप्त केले आहे. त्यात देशी दारुचे १८ बॉक्स म्हणजेच, १५६ लिटर देशी दारु जप्त केली आहे. वाहनासह पाच लाख एक हजार ८४० रूपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.

loading image
go to top