esakal | कोयना-कृष्णेच्या प्रीतिसंगमावर सापडला 18 व्या शतकातील अप्रकाशित 'शिलालेख'
sakal

बोलून बातमी शोधा

Inscription

कोयना-कृष्णेच्या प्रीतिसंगमावर सापडला 18 व्या शतकातील अप्रकाशित 'शिलालेख'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : येथील कोयना-कृष्णेच्या प्रीतिसंगमावर 18 व्या शतकातील मंदिरांची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणांचा अभ्यास करताना संकेत फडके यांना अप्रकाशित शीलालेख आढळला. ग्रामदेवता श्री कृष्णामाईच्या मंदिराजवळील नारायणेश्वर मंदिराच्या भिंतीवर तो शिलालेख आहे. त्या शिलालेखाची भाषा मराठी असली, तरी त्याची लिपी देवनागरी आहे.

याबाबत श्री. फडके म्हणाले, ""इतिहासाचा अभ्यास करताना ऐतिहासिक साधनांच्या स्वरूपात आढळणारे अनेक शिलालेख आहेत. ज्यांची माहिती अद्याप अप्रकाशित आहे. सध्या आढळलेल्या शिलालेखाच्या पहिल्या ओळींवर रंग लावला होता. काहीतरी लिहिलेले समजताच ज्येष्ठ इतिहास अभ्यासक के. एन. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रांच्या सहकार्याने शिलालेखाचा अभ्यास केला. शिलालेखाबाबत कुठेही मांडणी झालेली नाही. शिलालेखात मंदिर निर्मितीचा उल्लेख आहे. त्यावरून तो शिलालेख 1847 ते 1848 काळात पूर्ण झाल्याचे स्पष्ट होते.

36 लाखांत उजळणार इतिहासकालीन मोती तळ्याचे 'भाग्य'

शिलालेखाची लांबी 70, तर रुंदी 48 सेंटीमीटर आहे. शिलालेख अकरा ओळींचा आहे. पहिल्या ओळींतील अक्षरे अस्पष्ट आहेत. दाजीराव, अप्पाजी आणि देशपांडे नाडगौडी, कोळे व मरळी, इनामदार मौजे कोळेवाडी, बनपुरी, सणबूर रा. कोळेवाडी यांनी ग्रहस्थाश्रम त्याग केला. तेवीस वर्ष तीर्थ यात्रेत सात वर्षे संन्यास घेतला. त्रेपन्नावे वर्षी शके 1753 ला कऱ्हाड येथे समाधी घेतली. त्यांचा पुत्र नारायणराव यांनी कृष्णाकाठी स्थळ समाधी देऊन देवालयाचे काम सुरू केले. शके 1769 वैशाख कृ 3 दिवशी नारायणेश्वर प्रमुख पंचायतन नाव ठेऊन बाण लिंग स्थापना केली, असाही उल्लेख शिलालेखात आहे.

Edited By : Balkrishna Madhale