esakal | 36 लाखांत उजळणार इतिहासकालीन मोती तळ्याचे 'भाग्य'
sakal

बोलून बातमी शोधा

Moti Lake

36 लाखांत उजळणार इतिहासकालीन मोती तळ्याचे 'भाग्य'

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : शहरातील मोती तळ्याच्या सुशोभीकरणावर पालिकेने भर दिला असून, यासाठीची प्रशासकीय कार्यवाही पालिकास्तरावर सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोती तळ्यात तरंगते कारंजे उभारण्याबरोबरच परिसर विद्युत रोषणाईने उजळवण्यात येणार आहे.

सातारा शहरात मंगळवार तळे, रिसालदार तळे, मोती तळे, फुटके तळे, महादरे तळे, फरासखाना तळे आदी इतिहासकालीन तळी आहेत. यापैकी मंगळवार आणि मोती तळ्यात यापूर्वीच्या काळात शहरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत असे. मूर्ती विसर्जनामुळे तळ्यांतील पाणी प्रदूषित होऊन त्याची दुर्गंधी परिसरात पसरत असे. यामुळे त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या दोन्ही तळ्यांतील विसर्जन थांबविण्याचे आदेश पालिकेस दिले. गेल्या चार वर्षांहून अधिक काळ येथील विसर्जन बंद असून, या तळ्यांची नोंद ऐतिहासिक वारसास्थळांच्या यादीत झाली आहे. मोती तळ्याजवळून जाणाऱ्या ओढ्याचे पाणी तळ्यात शिरत असल्याने आतील पाणी प्रदूषित होते.

शाब्बास! ओडिशात कऱ्हाडच्या 'आयर्न मॅन'ची झक्कास कामगिरी

सध्या तळ्यातील पाण्यावर शेवाळ साठले असून, काही प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. दरवर्षी या तळ्यातील पाण्याची दुर्गंधी पसरत असल्याने या तळ्याचा विकास करण्याचा निर्णय पालिकास्तरावर घेण्यात आला. यासाठीचा आराखडा तयार करण्याचे काम पालिकास्तरावर सुरू आहे. आराखड्यानुसार तळ्यात तरंगते कारंजे उभारण्याबरोबरच तळ्याच्या भिंती सुशोभित करण्याचा तसेच परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई उभारण्याचा समावेश आहे. याचबरोबरच तळ्याच्या भिंतीलगत पदपथ बांधण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी नगराध्यक्षा माधवी कदम यांचा सुमारे 36 लाखांचा स्वनिधी खर्च होणार आहे.

Maharashtra Lockdown : गड्या आपला गावच लई बरा!

मोती तळ्यातील पाण्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेवाळ जमा होते. या शेवाळामुळे पाणी प्रदूषित होऊन प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी या तळ्यात कारंजे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-माधवी कदम, नगराध्यक्षा

Edited By : Balkrishna Madhale

loading image
go to top