शिवसैनिकांनी मनावर घेतल्यास काहीही शक्य

Shivsena
Shivsenaesakal
Summary

शिवसैनिकांनी मनावर घेतल्यास काहीही शक्य होते.

मलकापूर (सातारा) : शिवसेनेचा (Shivsena) नुकताच कऱ्हाडला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant), गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), जिल्हा उपनेते व संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील (Nitin Banugade-Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंपर्क मेळावा झाला. त्यामध्ये आगाशिवनगर येथील मोहसीन शेख, दीपक मुठ्ठल, राहुल चाळके, फिरोज मुल्ला, संग्राम गायकवाड यांच्यासह 200 युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मोहसीन शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोचवून बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, संपर्कप्रमुख संजय गायकवाड उपस्थित होते. मंत्री सामंत यांनी, शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचीच तयारी करुन कामाला लागावे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे जो आदेश देतील, जो निर्णय घेतील त्याप्रमाणे वाटचाल करावी आणि त्यांचे हात मजबूत करावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Shivsena
शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी भूमिका बदलणार?

गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वसामान्य शिवसैनिकाला समोर ठेवून काम करण्याचा दिलेला सल्ला आम्ही पाळला आहे. शिवसैनिकांनी मनावर घेतल्यास काहीही शक्य होते, हे सातारा जिल्ह्यात एकावरुन दोन आमदार गेले यावरुन दिसून येते. कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीतही ताकदीने सामोरे जावू. प्रभाग, वार्डनिहाय कार्यकर्त्यांनी चांगली तयारी केल्यास शिवसेनेचा प्रवेश कऱ्हाड नगरपालिकेत होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

Shivsena
राष्ट्रवादीच्या नेत्यांना धक्का; अर्ज माघारीस रांजणेंचा नकार

प्रा. बानुगडे-पाटील यांनी कोरोना महामारीत महाराष्ट्राला सावरण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थपणे केले. सत्तेसाठी राज्य सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न विरोधी पक्षाकडून सुरू असून गॅस, पेट्रोल, डिझेल यांची दरवाढ करून केंद्र सरकारने जनतेची आर्थिक लूट केली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. जिल्हा प्रमुख शेलार यांनी प्रास्ताविक केले. तालुका संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

Shivsena
शिवेंद्रराजेंनी उभारलेल्या 'राजधानी सातारा'वर उदयनराजेंचा कडक Selfie

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com