शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी भूमिका बदलणार?

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Summary

उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंचा संघर्ष जिल्हा बॅंक आणि आगामी सातारा पालिका निवडणुकीत दिसणार आहे.

सातारा : जिल्हा बॅंकेत (Satara Bank Election) राष्ट्रवादीच्या (NCP) सर्वसमावेशक पॅनेलमध्ये घ्यावे, या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी मागील सर्व मतभेद विसरून भेटीगाठीचे सत्र सुरू ठेवले आहे. फलटणमध्ये जाऊन त्यांनी काल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर (Speaker Ramraje Naik- Nimbalkar) यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर दोघांनी तासभर बंद खोलीत चर्चा केली. संजीवराजे नाईक-निंबाळकर (Sanjeevraje Naik-Nimbalkar) आणि गृहनिर्माण व दुग्ध संस्था मतदारसंघातून निवडणूक लढणारे फलटणचे नेते दिलीपसिंह भोसले यांचीही उदयनराजेंनी भेट घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसांत उदयनराजेंनी सुरू केलेले हे भेटीचे सत्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना भूमिका बदलण्यास कारणीभूत करण्याची शक्यता आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. त्यामध्ये केंद्रस्थानी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे (MLA Shivendrasinharaje Bhosale) आहेत. एकीकडे उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सहभागी करून घेण्याचा मुद्दा, तर दुसरीकडे आमदार शिवेंद्रसिंहराजेंकडून उदयनराजेंना होणारा विरोध आणि पाच जागांची मागणी यावरच सध्या चर्चेचा खल सुरू आहे. जिल्हा बॅंकेत सर्वसामान्य शेतकरी सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी उदयनराजेंना संचालक व्हायचे आहे, तर शिवेंद्रसिंहराजेंना मागील निवडणुकांतील बदला घेण्यासाठी या निवडणुकीत सर्वसामान्य संचालक त्यांच्या विरोधात निवडून आणायचा आहे, ही वस्तुस्थिती असली तरी उदयनराजेंनी मागील सर्व मतभेद विसरून रामराजेंशी भेटीचे सत्र सुरू ठेवले आहे.

Udayanraje Bhosale
महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

यापूर्वी ज्या विश्रामगृहात या दोन नेत्यांत संघर्षाची बिजे रोवली होती, त्याच विश्रामगृहात दोघांत जिल्हा बॅंकेत सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेण्यासाठी उदयनराजेंचा आग्रह सुरू आहे. रामराजेंनी त्यांचा निर्णय शिवेंद्रसिंहराजेंवर सोपवला आहे. त्यातून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंचा संघर्ष जिल्हा बॅंक आणि आगामी सातारा पालिका निवडणुकीत दिसणार आहे. जिल्हा बॅंकेत झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत गृहनिर्माण संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवार घोषित करावा, त्याला साताऱ्यातील सर्व मते आम्ही देऊ, असा सूचक इशारा शिवेंद्रसिंहराजेंनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी रामराजेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी तासभर कमराबंद चर्चा केली. त्यांच्यात जिल्हा बॅंकेत सामावून घेण्याबाबतच चर्चा झाली. मात्र, त्याविषयीचा तपशील समजला नाही. संजीवराजेंचीही उदयनराजेंनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी सभापती सुनील काटकर उपस्थित होते. गृहनिर्माण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेले दिलीपसिंह भोसले यांचीही त्यांनी भेट घेतली.

Udayanraje Bhosale
तसं झालं तर ठिक, अन्यथा राष्ट्रवादीविरोधात उदयनराजे निवडणूक लढवणार

शिवेंद्रसिंहराजेच घेणार निर्णय

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उदयनराजेंचे हे भेटीचे सत्र सुरू असले तरी राष्ट्रवादीचे सर्व नेते त्यांना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर शिवेंद्रसिंहराजेच करणार आहेत. येत्या दोन दिवसांत याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com