const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();

Pusesawali Riots : पुसेसावळी दंगल, नूरहसन शिकलगारच्या मृत्‍यूप्रकरणी मोठी अपडेट; 23 जण एलसीबीच्या ताब्यात, 16 जणांना पोलिस कोठडी

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्‍या नूरहसन शिकलगार (वय २७) यांचा मृत्यू झाला होता.
Pusesawali Riots
Pusesawali Riotsesakal
Summary

जमावाने प्रार्थनास्‍थळावर हल्‍ला करत त्‍याठिकाणी असणाऱ्या दहा जणांना मारहाण केली होती.

औंध : पुसेसावळी येथील दंगल (Pusesawali Riots) आणि नूरहसन शिकलगार यांच्‍या मृत्‍यूप्रकरणी दाखल असणाऱ्या गुन्ह्यात २३ जणांना अटक करण्‍यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास स्‍थानिक गुन्‍हे शाखा करत असून, अटकेतील त्‍या २३ जणांना काल सायंकाळी सातारा येथे आणण्‍यात आले.

येथील सातारा शहर पोलिस (Satara City Police) ठाण्‍याच्‍या कोठडीत रवानगी करण्‍यात आली आहे. आक्षेपार्ह पोस्‍टच्‍या वादातून पुसेसावळी येथील जमावाने अल्पसंख्याक बांधवांची घरे, दुकाने, वाहने लक्ष्‍य करत तोडफोड, जाळपोळ केली होती. याचदरम्‍यान जमावाने प्रार्थनास्‍थळावर हल्‍ला करत त्‍याठिकाणी असणाऱ्या दहा जणांना मारहाण केली होती.

Pusesawali Riots
Loksabha Election : 'सर्व पक्ष एक झाले तर मोदींचा पराभव निश्चित होईल'; महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्‍या नूरहसन शिकलगार (वय २७) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी औंध पोलिस ठाण्‍यात खून, शासकीय कामात अडथळा आणण्‍यासह एकूण तीन गुन्‍हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत दंगल, मृत्‍यूप्रकरणात २३ जणांना अटक केली आहे.

Pusesawali Riots
Chaitra Kundapur : हालश्री स्वामीजींना अटक करा, बड्या नेत्यांची नावं समोर येतील; हिंदुत्ववादी नेत्या चैत्राचं स्फोटक विधान

या गुन्ह्याचा तपास स्‍थानिक गुन्‍हे शाखा करत असून, त्‍यांच्‍या पथकाने तपासासाठी औंध पोलिसांच्‍या ताब्‍यातील २३ जणांना आज सायंकाळी सातारा येथे आणले. त्‍यांची रवानगी सातारा शहर पोलिस ठाण्‍याच्‍या कोठडीत करण्‍यात आली असून, त्‍यांच्‍याकडे दंगलप्रकरणी मुख्‍य गुन्ह्याच्या अनुषंगाने स्‍वतंत्रपणे चौकशी करण्‍यात येत आहे.

'त्‍या' १६ जणांना आज न्‍यायालयात आणणार

शासकीय कामात अडथळा आणल्‍याप्रकरणी अटकेत असणाऱ्या १६ जणांच्‍या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्‍याने त्‍यांना शनिवारी वडूज येथील न्‍यायालयात (Vaduj Court) हजर करण्‍यात येणार आहे.

Pusesawali Riots
Pusesawali Riots : उसळलेल्या दंगलीनंतर पुसेसावळीतील जनजीवन सुरळीत; अद्यापही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

यामध्‍ये ज्योतीराम आनंदराव भाडुगळे, किशोर शहाजी कदम, जयराम अशोक नागमल, किरण गोरख घार्गे, विजय बजरंग निंबाळकर, सोमनाथ बाबूराव पवार, महेश रामचंद्र कदम, विकास वसंत घार्गे, शिवाजी विनायक पवार, श्रीनाथ हणमंत कदम, दादासाहेब मारुती माळी, सागर संपत जाधव (सर्व रा. वडगाव जयराम स्वामी), अनिरुद्ध सतीश देशमाने (रा. पुसेसावळी), नीलेश अनिल सावंत, सागर सिद्धनाथ सावंत, सुमित चंद्रकांत जाधव (सर्व रा. गोरेगाव वांगी) यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com