
सातारा जिल्ह्यातील २४९ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणुक आयोगामार्फत आज जाहीर करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील २४९ ग्रामपंचायतीत निवडणुकीची रणधुमाळी
कऱ्हाड - सातारा जिल्ह्यातील २४९ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणुक आयोगामार्फत आज जाहीर करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सर्वाधीक ८६ ग्रामपंचायतींचा तर खटाव तालुक्यातील सर्वात कमी दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीबाबतची नोटीस प्रसिध्द केली आहे. अर्ज भरण्यास 28 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. दोन डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज छाननी पाच डिसेंबरला होणार आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख सात डिसेंबर आहे. तर त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. यामुळे आता सातारा जिल्ह्यातील २४९ गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. त्यामध्ये जावळी तालुक्यातील १५, कऱ्हाड तालुक्यातील ४४, खंडाळा तालुक्यातील दोन, खटाव तालुक्यातील १५, कोरेगाव तालुक्यातील ५१, महाबळेश्वर तालुक्यातील सहा, माण तालुक्यातील ३० तर पाटण तालुक्यातील सर्वाधिक ८६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.