

Satara to Get Majestic 25-Ft Shivaji Maharaj Statue, Enhancing City’s Glory
Sakal
सातारा : ऐतिहासिक सातारा शहराचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा २५ फूट उंच भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. चबुतऱ्यासह या स्मारकाची एकूण उंची ४० फूट असणार आहे. नव्याने बसविणाऱ्या या पुतळ्यामुळे सातारा शहराचे रुपडे पालटणार असून, शहराच्या वैभवात भर पडणार आहे. या प्रस्तावित कामाची पाहणी आज मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत प्रसिद्ध मूर्तिकार श्री. सुतार उपस्थित होते.