
संजय जगताप
मायणी : ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत मुख्य वीजवाहिनीवरील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, उकाड्याने मायणीकर अक्षरशः शिजून निघाले. वारंवार जळणाऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी अधिक क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवावा. उन्हाळ्याच्या दिवसांत अखंड वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.