
सातारा: गेल्या काही महिन्यांपासून शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, पर्यवेक्षक व इतर पदावरील कायमस्वरूपी ३५० हून अधिक कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन झाले नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना वेतनाविना राहावे लागत असल्याने राज्य सरकारच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.