Maharashtra Lockdown : साताऱ्यात 'E-pass'साठी 36 हजार अर्ज दाखल; 24 हजार अर्ज मंजूर

लॉकडाउननंतर इतरत्र जाण्यासाठी राज्य शासनाने नागरिकांना ई-पासचे बंधन घातले आहे.
E-pass
E-passesakal

सातारा : लॉकडाउननंतर इतरत्र जाण्यासाठी राज्य शासनाने नागरिकांना ई-पासचे (E-pass) बंधन घातले आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी गेल्या तीन आठवड्यात 36 हजार 536 नागरिकांनी पोलिस यंत्रणेकडे ऑनलाइन (Online E-pass) अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अति तातडी, वैद्यकीय आणि अत्यावश्‍यक कारणास्तव दाखल असणारे 24 हजार 180 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. दाखल अर्जांचा निपटारा करण्यासाठी ई-पास कक्षातील 15 कर्मचारी कार्यरत आहेत. (36 Thousand Citizens Apply For E-pass In Satara District)

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर करत अत्यावश्‍यक, तातडीच्या आणि वैद्यकीय कारणासाठी जिल्हा ओलांडून जाण्यासाठी नागरिकांना ई-पासचे बंधन घातले. त्यानुसार ई-पासवरील कार्यवाही करण्याचे अधिकार शासनाने पोलिस यंत्रणेकडे सुपूर्द केले. सातारा जिल्हा पोलिस दलाने ई-पास कक्ष स्थापन केला आहे. या ठिकाणी 15 कर्मचारी कार्यरत असून जिल्हा प्रवेशासाठी दाखल होणाऱ्या ऑनलाइन अर्जांची छाननी त्यांच्याकडून करण्यात येते.

E-pass
चिंताजनक! साताऱ्यात गळतीमुळे 25 टक्के Oxygen वाया; प्लांटसाठी प्रयत्न आवश्‍यक

ई-पाससाठी अर्ज करतानाच सोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे व तो अर्ज मंजूर, नामंजूर करत त्याबाबतचा मेसेज त्यांच्याकडून अर्जदारास पाठविण्यात येत आहे. गत महिन्याच्या 24 तारखेपासून आजपर्यंत ई-पाससाठीचे 36 हजार 536 ऑनलाइन अर्ज दाखल झाले होते. या दाखल अर्जांची छाननी केल्यानंतर दाखल अर्जांपैकी 24 हजार 180 अर्ज मंजूर केले आहेत. सबळ कारणाशिवायचे 12 हजार 356 अर्ज नामंजूर करण्यात आले.

अत्यावश्‍यक कारणासाठीच अर्ज करा

जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी ई-पासचे बंधन आहे. अत्यावश्‍यक तसेच वैद्यकीय कारणांसाठीच नागरिकांनी ई-पाससाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करणे आवश्‍यक आहे. अनावश्‍यक अर्ज दाखल झाल्यास त्याचा नाहक ताण ई-पास कक्षातील कर्मचाऱ्यांवर येतो. त्यामुळे नागरिकांनी फक्‍त अत्यावश्‍यक कारणांसाठीच अर्ज करण्याचे आवाहन पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

36 Thousand Citizens Apply For E-pass In Satara District

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com