dengue infection
sakal
कऱ्हाड - मुंढे (ता. कऱ्हाड) येथे डेंगीसदृश्य आजाराचे रूग्ण आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांत गावात सुमारे ४० जणांना डेंगीसदृश्य आजाराची लागण झाल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. गावातील विविध वस्त्या आणि मळ्यांमध्ये रुग्ण आढळत असल्याने साथीचा फैलाव रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.