Manoj Jarange Patil : पश्चिम महाराष्‍ट्रातील ४२ लाख मराठ्यांना आरक्षण लाभ मिळेल

पश्चिम महाराष्ट्रातील ४२ लाख मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. त्यामुळे घटनेत, कायद्यात त्यांना ते बसवायला लागणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरू आहे.
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

sakal

Updated on: 

कऱ्हाड - सातारा गॅझेटियरसाठीच यावेळचे आंदोलन उन्हात केले. त्यासाठी सरकारने एक महिन्याचा कालावधी मागितला. मात्र, त्यांना दोन महिन्यांचा कालावधी घेण्यास सांगितले असून, त्यानंतर निघणारा मराठा समाजाचा अध्‍यादेश पक्का काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कसलीही हालचाल करता येणार नाही. त्याद्वारे पश्चिम महाराष्ट्रातील ४२ लाख मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल, असा विश्वास मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com