पाटण तालुक्यातील 49 गावात अजूनही भय इथे संपत नसल्याचे वातावरण

पाटण तालुक्यातील 49 गावात अजूनही भय इथे संपत नसल्याचे वातावरण
Summary

पाटण तालुक्याची दरडग्रस्त बनलेल्या पाटण तालुक्यातील जनतेची भय इथे संपत नसल्याचे अधोरेखित झालेले आहे.

सातारा: 22 जुलै रोजी पाटण तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने अनेक गावात होत्याचे नव्हते झाले. पाटण तालुक्यातील कोयना, मोरणा, तारळे विभागातील काही गावे शापित झाली आहेत. भुकंपग्रस्त अशी ओळख असणारा तालुका दरडग्रस्त झाला आहे. 22 जुलै महिन्यानंतर नेहमीच दहशतीखाली असणारी पाटण तालुक्यातील 39 गावे आहेत. जीव मुठीत घेवून ती या ठिकाणी राहत आहेत. या गावांना भूसख्खलनचा धोका असून या गावांचे कधीही मिरगाव होवू शकते. यामुळे या गावातील ग्रामस्थांनी आपले अन्यत्र सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करा. अशी मागणी शासनाकडे केली आहे. यामुळे पाटण तालुक्याची दरडग्रस्त बनलेल्या पाटण तालुक्यातील जनतेची भय इथे संपत नसल्याचे अधोरेखित झालेले आहे.

पाटण तालुक्यातील 49 गावात अजूनही भय इथे संपत नसल्याचे वातावरण
सातारा : अनैतिक संबंधातून पत्नीसह प्रेयसीचा काढला काटा

धरणग्रस्त, भुकंपग्रस्त, अभयारण्यग्रस्त, अशी ओळख असणारा पाटण तालुका 22 जुलैला या तालुक्याला दरडग्रस्त ही उपाधी मिळाली आहे. पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील आंबेघर तर कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या ठिकाणी मुसळधार अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होवून या गावांवर आपत्तीचा डोंगर कोसळला आहे. जीवितहानी बरोबर वित्तहानीचा आकडा काळीज पीळवटून टाकणारा आहे. 22 जुलै पासूनच पाटण तालुक्यातील 39 गावातील जनता भयकंपित झाली आहे. या सर्व गावांच्या मानगुटीवर भूसख्खलनाची टांगती कायम आहे.

पाटण तालुक्यातील 49 गावात अजूनही भय इथे संपत नसल्याचे वातावरण
सातारा: प्रवीण जाधव आपल्या गावी परतला; पाहा व्हिडिओ

पाटण तालुक्यातील चोपदारवाडी (डावरी) आंबेघर तर्फ मरळी (खालची), आंबेघर तर्फ मरळी (वरची), वरडेवाडी, काहीर, शिदृकवाडी, दिक्षी, मेंढोशी (बोर्गेवाडी), खुडुपलेवाडी, पळासरी, कोयना विभागातील मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे, जोतिबाचीवाडी, गुंजाळी, झाकडे, लेंढोरी, मिरासवाडी (शिरळ), बाजे, गोकुळनाला या दहा गावाबरोबर गुजरवाडी (महाव्शी), जितकरवाडी, भातडेवाडी (जिंती), धनवडेवाडी-शिंदेवाडी (निगडे) जोशेवाडी (काळगाव), काळगावखालचे व वरचे, चाफोलीअरल, शिंदेवाडी कुसरुंड, मोरगिरी जुना गावठाण, अटोली गूरेघर अंतर्गत कोकणेवाडी, किल्ले मोरगिरी, नाटोशी (शिर्केवस्ती), भैरेवाडी, विठ्ठलवाडी शिरळ (धनगरवस्ती), बागलेवाडी (सावरघर) विठ्ठलवाडी (सणबुर), जुगाईवाडी, डफळवाडी, केंजळेवाडी, केळंबे, गायमुखवाडी, कूसरुंड (शिंदेवस्ती), आंबवणे, बोन्द्री (गोजेगाव वस्ती), नायकवडेवस्ती (जुंगटी), तामिणे या ३८ गावांना भूसख्खलनाचा तर विहे या गावाला कोयना नदीला महापूर येत असल्याने धोका निर्माण झाला आहे.

पाटण तालुक्यातील 49 गावात अजूनही भय इथे संपत नसल्याचे वातावरण
'प्रवीणच्या कुटुंबीयांना सातारा सोडण्याची वेळ येवू देणार नाही'

या 49 संभाव्य धोका निर्माण होणाऱ्या आपत्तीग्रस्त गावातील कुटुंबाची संख्या ३०२७ असून विस्थापित करावी लागणारी कुटुंब संख्या २४४५ एवढी प्रचंड आहे. या सर्व गावांनी आपले कायमस्वरूपी स्थलांतर करावे अशी मागणी केली आहे. इतक्या लोकांना अन्यत्र स्थलांतरीत करणे ही प्रशासनासमोर डोकेदुखीच ठरणार आहे.

पाटण तालुक्यातील 49 गावात अजूनही भय इथे संपत नसल्याचे वातावरण
..तर सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरं महापुरात तरंगली असती!

पाटण तालुक्यात कोणत्याही ठिकाणी आपत्ती आली तर त्या गावांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणे गरजेचे आहे. भविष्यात भूसख्खलनचा मोठा धोका पाटण तालुक्याला आहे. स्थलांतरीत जनतेला वीज पाणी, निवारा व सर्व सुविधाने युक्त असणारे ठिकाण सध्या तरी कोयनानगर सोडून कुठेही नाही. शासनाने कोयना प्रकल्पाच्या 150 वसाहतीतील मोडकळीस आलेल्या खोल्या दुरूस्त करून या ठिकाणी भूसख्खलनामध्ये बाधित झालेल्या आपत्ती ग्रस्तांना स्थलांतरीत केलेल्या या खोल्या दुरूस्त केल्या आहेत. यापुढे पाटण तालुक्यात कोणतीही आपत्ती आली तर या खोल्यामध्ये आपत्तीग्रस्त जनतेला स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने निश्चित केले असल्याने कोयनानगर बाधिताचे आश्रयस्थान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com