esakal | ..तर सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरं महापुरात तरंगली असती!
sakal

बोलून बातमी शोधा

Flood 2021

22 ते 29 जुलै या 8 दिवसांतच झालेल्या धुवांधार पावसाने धरणात 37 टीएमसी पाणीसाठा आला आहे. त्यावेळी धरणात 66 टीएमसी पाणीसाठा होता.

..तर सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरं महापुरात तरंगली असती!

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (सातारा) : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात गत सप्तहात रेकॉर्ड ब्रेक झालेल्या मुसळधार पावसाने धरणात 3 लाख पाण्याची आवक येत होती. धरणात आलेली पाण्याची आवक नदीपात्रात सोडण्याचे काम 22 जुलैपासून सुरूच होते. या काळात धरणात येत असलेली पाण्याची आवक नदीपात्रात न सोडता ते पाणी धरणात साठविण्याचे काम कोयना प्रशासनाने करुन महापूर रोखून धरला आहे. तो पाणीसाठा नदीपात्रात सोडला असता, तर भीतीच्या छायेखाली असणारे सांगली, कोल्हापूर, साताऱ्यात गत सप्तहातच महापूर येवून जलसमाधी मिळून या ठिकाणी 2019 ची अनुभूती आली असती. (Flood 2021 Danger Of Floods To Sangli Satara Kolhapur Districts bam92)

22 ते 29 जुलै या 8 दिवसांतच झालेल्या धुवांधार पावसाने धरणात 37 टीएमसी पाणीसाठा आला आहे. त्यावेळी धरणात 66 टीएमसी पाणीसाठा होता. धरणात मुसळधार पावसाने आलेला 37 टीएमसी पाणीसाठा साठवला असता, तर धरणात 103 टीएमसी पाणीसाठा होवून धरण पूर्ण क्षमतेने भरले असते. धरणाच्या वक्र दरवाजातून 22 तारखेपासून आत्तापर्यंत 13 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. धरण परिचलन सूचीप्रमाणे कोयना प्रशासन चालले असते तर सांगली, सातारा, कोल्हापूर ही मोठी शहरे महापुरात तरंगली असती. केवळ 9 दिवसात कोयनानगर येथे 1,497 मिमी तर नवजा येथे 1,696 मिमी तर महाबळेश्वर येथे 1,798 मिमी पाऊस झाला आहे.

हेही वाचा: साताऱ्यात रेड अलर्ट; सांगलीत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश

koyna dam

koyna dam

मुसळधार पावसासाठी प्रती चेरापुंजी अशी ओळख असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात केवळ 9 दिवसात कोयनानगर येथे 29 % नवजा येथे 34 % तर महाबळेश्वर येथे 35 % पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात पाणलोट क्षेत्रात केवळ 25 % पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरण परिचलन सूचीप्रमाणे कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे 9 फुटावर उघडण्यात आले आहेत. धरणाच्या दरवाजातून 49,344 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण परिचलन सूचीप्रमाणे धरणात आजच्या तारखेला 77 टीएमसी ठेवणे बंधनकारक आहे. धरणात सध्या 90.46 टीएमसी पाणीसाठा आहे. यामुळे धरणातून 13 टीएमसी पाणीसाठा चार दिवसात सोडण्यात येणार असल्याचे कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नीतेश पोतदार यांनी सांगितले.

Flood 2021 Danger Of Floods To Sangli Satara Kolhapur Districts bam92

loading image
go to top