
खंडाळा : आठ दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या अपहरणप्रकरणी शिरवळ पोलिसांनी पाच संशयितांसह मारहाण करण्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र ताब्यात घेतले आहे. अनिल ऊर्फ पाप्या शामराव वाडेकर, वैभव माणिकराव नवथर (दोघे रा. शिरवळ), बाळा भानुदास मंजुळे, सुनिकेत संतोष माने, पारस विश्वास भोसले (तिघे रा. सांगवी) अशी संशयितांची नावे आहेत.