
-सचिन शिंदे
कऱ्हाड : शहर व परिसरात २०२१ मध्ये आलेल्या महापुरात शहरातील ७० हून अधिक व्यापाऱ्यांची ५० लाखांची नुकसान भरपाई गेल्या चार वर्षांपासून शासनाने दिली नाही. चार वर्षे उलटूनही अद्याप त्या नुकसानीपोटी व्यापाऱ्यांना दमडीची मदत मिळालेली नाही. त्यामुळे चार वर्षे भरपाईची केवळ प्रतीक्षाच सुरू आहे. सलग चार दिवस बाजारपेठ पाण्याखाली होती. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प होती. यंदा पावसाळा तोंडावर आहे, तरीही काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. वास्तविक, हवामान खात्याने जोरदार पाऊस होणार असल्याचे जाहीर केल्याने व्यापाऱ्यांत चिंता आहे.