
खटाव : शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, हे वाक्य फक्त म्हणायला सोपं आहे; पण ते खरं करून दाखवणं तेवढंच अवघड आहे. जांब (ता. खटाव) येथील अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या संगीता जनार्दन गुरव यांनी तेच करून दाखविले आहे. त्या दहावीची परीक्षा वयाच्या ५५ व्या वर्षी उत्तीर्ण झाल्या आहेत.