
-सुनील शेडगे
नागठाणे : छंदाला वयाचे, वेळकाळाचे बंधन नसते. हेच दाखवून देताना एका प्राथमिक शिक्षकाने निवृत्तीनंतर पाच वर्षांत तब्बल ५० हजार किलोमीटरचे अंतर सायकलवरून पुरे केले आहे. हे करताना त्यांनी आरोग्य, पर्यावरणाविषयी समाजाला दिलेला मंत्रही तितकाच महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.