

Teachers in Satara await relieving after transfer orders amid administrative confusion.
Sakal
-प्रशांत घाडगे
सातारा: प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमबद्धता असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, काही शिक्षकांना मोठ्या अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी एक हजार ७७७ प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. मात्र, यामधील दुर्गम भागात सेवा बजावलेल्या तब्बल ६० शिक्षकांना बदलीचे आदेश देऊनही अद्याप कार्यमुक्त केले नाही. संबंधित शिक्षकांच्या शाळा एकशिक्षकी असल्याचे कारण पुढे करून त्यांना सोडले जात नसल्याचे समोर आले आहे.