वर्षभरात पुणे-बंगळुरू महामार्गावरील अपघातात 65 जणांचा मृत्यू

सर्वाधिक मृत्यू पुणे-बंगळुरू महामार्गावर
Accident
Accidentesakal

कऱ्हाड (सातारा) : जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख पुणे ते बंगळुरू महामार्गावर (Pune to Bangalore Highway) वाहनांच्या वेगाने लॉकडाउनच्या (corona lockdown) वर्षभरात अवघ्या 22 अपघातात (Accident) तब्बल 31 जणांना जीव गमावावा लागला आहे. या प्रमुख महामार्गासहीत अन्य दहा राष्ट्रीय महामार्गावर 2020 या वर्षात 200 अपघात झाले आहेत. त्यात 65 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 164 जणांना कायमाची दुखापत झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच महामार्गावरील प्रवास धोक्याचा झाला आहे.

Summary

पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या वेगाने लॉकडाउनच्या वर्षभरात अवघ्या 22 अपघातात तब्बल 31 जणांना जीव गमावावा लागला आहे.

पुणे ते बंगळुरू महामार्गावरील वेगवान वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी महामार्गावर वेगवान वाहनांवर कारवाई करूनही मोठ्या शहरातील वाहनधारकांच्या वाहनांचा वेग कमी झाला नाही. परिणामी, कमी अपघातात मृतांची संख्या जास्त झाली. जानेवारी ते मार्च दरम्यात वेगवान वाहनांचे 81 अपघात झाले. त्यात 35 जणांना जीव गमावला, तर 104 जण जखमी झाले. तर 2020 मध्ये वर्षभरात तीच अपघातांची संख्या 90 झाली आहे. त्यातही वेगवान वाहनामुळे झालेल्या अपघाताची संख्या 22 असून त्यात 31 जणांनी जीव गमावला आहे. वेग कमी व्हावा, यासाठी महामार्ग पोलिसांनी उपाययोजना करत आहेत.

Accident
पाटणात 325 गावांत 118 कोटींची हानी

दंडात्मक कारवाई वर्षात तब्बल 20 हजारहून अधिक वेगवान वाहनांवर कारवाई झाली आहे. त्यात दोन कोटीहून अधिक दंड वसूल केला आहे. तरीही वाहनांचा वेग काही कमी होताना दिसत नाही. पुणे-बंगळुरू महामार्ग वगळता अन्य दहा राष्ट्रीय महामार्गावरही अपघाताची संख्या वाढली आहे. सातारा ते पंढरपूर, कऱ्हाड ते नातेपुते, दौंड ते वीटा, महाबळेस्वर ते दहिवडी, महाबळेश्वर ते विटा, खंडाळा ते सांगली, मल्हारपेठ ते पंढरपूर, म्हसवड ते माळशिरस, चिपळूण ते विटा आणि कऱ्हाड ते मलकापूर (जि. कोल्हापूर) आदी महामार्गांचा समावेश आहे. त्या सगळ्या महामार्गावर सध्या वाहनांची संख्याकमी जास्त असते. मात्र, वर्षभराचा निम्मा कालावधी लॉकडाउनमध्ये गेला आहे, तरीही या दहाही महामार्गावर 85 अपघातांची नोंद झाली आहे. त्यात 34 जणांचा मृत्यू तर 83 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. चिपळूण, विटा, पंढरपूर आणि माळसिरस मार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहेत.

Accident
..तर 15 ऑगस्टला आत्मदहन करणार; दशरथ फुलेंचा सरकारला इशारा

ही आहेत कारणे..

  • वाहनांच्या वेगाची मर्यादा ताशी 150 किलोमीटरहून अधिक

  • पोलिसांच्या कारवाईलाही न जुमानता वाढणारा वाहनांचा वेग

  • महामार्गावर काम सुरू असल्याने डायव्हर्शन लक्षात न आल्याने होणारे अपघात

  • रात्री होणाऱ्या अपघातातही अमर्याद वेगानेच केला घात

  • पावसाळ्यात दुरावस्था झालेले महामार्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com