

Unexpected Closure of 716 Aadhaar Centres Disrupts Student Services Across Maharashtra
esakal
इमरान शेख
रहिमतपूर: राज्यातील शिक्षण विभागामार्फत कार्यरत असलेले सुमारे ७१६ आधार नोंदणी व अद्ययावत (आधार) संच २७ जूनपासून कोणतीही पूर्वसूचना, लेखी आदेश किंवा अधिकृत ई-मेल न देता अचानक बंद करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही सेवा ठप्प असल्याने विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत काम, शाळांचे प्रशासकीय कामकाज आणि शेकडो आधार ऑपरेटरांचे रोजगार एकाच वेळी संकटात सापडले आहेत.